Friday, September 15, 2017

थिएटर ऑफ़ रेलेवेंस का दिल्ली नाट्योत्सव

थिएटर ऑफ़ रेलेवेंस के दिल्ली नाट्योत्सव ने दर्शकों को झकझोरा और उसकी चेतना को नया सोच और नई दृष्टि दी !

थिएटर ऑफ़ रेलेवेंस नाट्य दर्शन के सृजन और प्रयोग के 25 वर्ष पूरे हुए. अपने सृजन के समय से ही देश और विदेश, जहां भी इस नाट्य दर्शन की प्रस्तुति हुई, न सिर्फ दर्शकों के बीच अपनी उपादेयता साबित की, बल्कि रंगकर्मियों के बीच भी अपनी विलक्षणता स्थापित की. इन वर्षों में इस नाट्य दर्शन ने न सिर्फ नाट्य कला की प्रासंगिकता को रंगकर्मी की तरह पुनः रेखांकित किया, बल्कि एक्टिविस्ट की तरह जनसरोकारों को भी बार बार संबोधित किया. दर्शकों को झकझोरा और उसकी चेतना को नया सोच और नई दृष्टि दी. इन 25 वर्षों में थिएटर ऑफ़ रेलेवेंस के सृजनकार मंजुल भारद्वाज ने भारत से लेकर यूरोप तक में अपने नाट्य दर्शन के बिरवे बोये, जो अब वृक्ष बनने की प्रक्रिया में हैं. इन 25 वर्षो के सफ़र के माध्यम से मंजुल ने यह भी साबित किया कि बिना किसी सरकारी अनुदान और कॉरपोरेट प्रायोजित आर्थिक सहयोग के बिना भी सिर्फ जन सहयोग से रंगकर्म किया जा सकता है और बिना किसी हस्तक्षेप के पूरी उनमुक्तता के साथ किया जा सकता है. ऐसे में 25 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में एक उत्सव तो बनता ही था. सो 10, 11 और 12 अगस्त को राजधानी दिल्ली के ऑडिटोरियम में तीन दिवसीय नाट्य उत्सव का आयोजन किया गया.

 उत्सव की शुरुआत गर्भनामक नाटक से हुई. इसके कलाकार थे, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, योगिनी चौंक और तुषार म्हस्के. इस नाटक के जरिए विश्व भर में नस्लवाद, धर्म, जाति और राष्ट्रवाद के बीच हो रही खींचतान में फंसी या गुम होती मानवता को बचाने के संघर्ष की गाथा को बड़ी खूबसूरती के साथ प्रस्तुत किया गया. अभिनय के स्तर पर वैसे तो सभी कलाकारों ने बढ़िया काम किया, लेकिन मुख्य भूमिका निभा रही अश्वनी नांदेड़कर का अभिनय अद्भुत था. हर भाव, चाहे वह 'डर' हो, 'दर्द' हो या खुशी हो, जिस आवेग और सहजता के साथ मंच पर प्रकट हुआ, वह अभूतपूर्व था. 
 दूसरे दिन अनहद नाद : unheared sounds of universe’ का मंचन हुआ. इसमें भी उन्हीं सारे कलाकारों ने अभिनय किया. इस नाटक में इंसान को उन अनसुनी आवाजों को सुनाने का प्रयास था, जो उसकी अपनी आवाज़ है, पर जिसे वह खुद कभी सुन नहीं पाता, क्योंकि उसे आवाज़ नहीं शोर सुनने की आदत हो गई है. वह शोर जो कला को उत्पाद और कलाकार को उत्पादक समझता है. जो जीवन प्रकृति की अनमोल भेंट की जगह नफे और नुकसान का व्यवसाय बना देता है. सभी कलाकारों ने सधा हुआ अभिनय किया. लगा नहीं कि कलाकार चरित्रों को साकार कर रहे हैं, ऐसा लगा, मानो हम स्वयं अपने शरीर से बाहर निकल आये हों. 



 तीसरे दिन, 12 अगस्त को न्याय के भंवर में भंवरीका मंचन देखने को मिला. इस नाटक की एक और विशेषता थी, इसमें एक ही कलाकार बबली रावत का एकल अभिनय था. मानव सभ्यता के उदय से लेकर आजतक जिस प्रकार पितृसत्ता से उपजी शोषण और दमनकारी वृति  ने नारी के लिए सामाजिक न्याय और समता का गला घोंटा है और कैसे इस पुरुष प्रधान समाज में परंपरा और संस्कृति के नाम पर महिलाओं को गुलामी की बेड़ियों में कैद करने की साजिश रची गई, इसका मजबूत विवरण औए विश्लेषण मिलता है.

बबली जी ने बड़ी परिपक्वता के साथ नारी के दर्द को उजागर किया और पूरे नाटक के दौरान दर्शकों की सांस को अपनी लयताल से बांधे रखा. जिस दृढ़ता से उन्होंने अपने आप को 'मर्द' कहकर सीना चौड़ा करने वाले पुरूषों को आईना दिखाया, उस अनुभूति को शब्द में बयान करना जरा मुश्किल है.
संकेत आवले ने प्रकाश संयोजन को बखूबी संभाला. दिल्ली में थिएटर ऑफ़ रेलेवंस नाट्य दर्शन के तले पल्लवित पुष्पित रंगकर्मी स्मृति राज ने इस रंग उत्सव का आयोजन कर दिल्ली को एक नए एवम् अनूठे रंग अनुभव से रूबरू कराया !

जब मैं नाटक देखने गई थी, तब यही सोच था कि इन नाटकों में भी वैसा ही कुछ देखने को मिलेगा, आमतौर पर जैसा हम आज तक थिएटर में देखते आए हैं, लेकिन थिएटर ऑफ़ रेलेवंस ने मेरी इस धारणा को तोड़ा कि थिएटर सिर्फ एक मनोरंजन का साधन है. यह मनुष्य की अंतरात्मा को झिंझोड़ कर उसे चैतन्य भी बना देता है.

रोहिणी
 थियेटर ऑफ रेलेव्हन्स दिल्ली नाट्य महोत्सव

थिएटर ऑफ रेलेव्हन्स च्या दिल्ली नाट्य महोत्सवाने प्रेक्षकांचे आत्मिक मंथन केले आणि त्यांच्या चेतनेला नवीन विचार आणि नवीन दृष्टि दिली.

"थिएटर ऑफ रेलवन्स" या नाट्य दर्शनाची निर्मिती आणि त्याच्या प्रयोगशीलतेला २५ वर्षे पूर्ण झाली. या नाट्य दर्शनाच्या निर्मितीच्या काळापासूनच देशा-परदेशात, जिथे जिथे या नाट्यदर्शनाची प्रस्तुती झाली तिथे प्रेक्षकांमध्ये आपली सत् प्रयोगिकता साध्य केली आणि रंगकर्मीं मध्ये आपल्या अद्वितियतेची स्थापना केली . ह्या २५ वर्षात थिएटर ऑफ रेलवन्स नाट्य दर्शनाने न केवळ रंगकर्मीच्या भूमिकेत नाट्य कलेतील समर्पकतेला रेखांकित केले , तर रंग आंदोलनकर्त्याच्या स्वरूपात जन कार्यकर्त्यांना सातत्याने संबोधित केले. प्रेक्षकांचे आत्मिक मंथन केले आणि त्यांच्या चेतनेला नवीन विचार आणि नवी दृष्टि दिली. ह्या एक चतुर्थांश शतकाच्या कालावधीत थिएटर ऑफ रेलवन्स चे जनक मंजुल भारद्वाराज यांनी भारता सहित युरोप पर्यंत आपल्या नाट्य दर्शनाचे बीजारोपण केले जे आता कल्पवृक्ष होणाच्या प्रक्रियेत आहे.
ह्या २५ वर्षीय प्रवासाच्या माध्यमातून मंजुल भारद्वाज यांनी हे सिद्ध करून दाखवले कि, विना सरकारी अनुदान व कॉर्पोरेट प्रायोजित आर्थिक सहयोगा विना जन सहयोगातून रंगकर्म करता येते आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय ते पूर्ण उन्मुक्ततेसह करता येते. अशा वेळेस 25 वर्ष पूर्ण होण्याच्या सन्मानार्थ उत्सव साजरा व्हायलाच हवा म्हणून आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथील नाट्यगृहात १०,११ व १२ ऑगस्ट २०१७ रोजी  तीन दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले गेले.
  "गर्भ" या नाटकापासून नाट्यउत्सवाची सुरूवात झाली . या नाटकातील कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, योगिनी चौक आणि तुषार म्हस्के होते. या नाटकाच्या माध्यमाने जगभरात होत असलेल्या वंशभेद ,जातिभेद, धर्म, आणि राष्ट्रवादाच्या ओढाताणीत अडकलेल्या किंवा लुप्त होत असलेल्या  मानवतेला वाचवण्याची संघर्ष गाथा अतिशय सौंदर्यासह सादर केली आहे. सर्व कलाकारांनी अभिनयाच्या स्तरावर उत्तम काम केले, परंतु मुख्य भूमिकेतील अश्विनी नांदेडकर च्या अभिनयाची भूमिका विस्मयकारक होती. प्रत्येक भावना - भय , वेदना असो , आनंद असो ज्या आवेगाने आणि सहजतेने ती रंगमंचावर प्रकट करत होती ते अभूतपूर्व होते. 

नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी " अनहद नाद - Unheard Sounds of Universe " ची प्रस्तुती झाली. ह्या नाटकात देखील ह्याच  कलाकारांनी अभिनय केला.ह्या नाटकात मानवाने न ऐकलेले आवाज ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे, जो त्याचा स्वतःचा आवाज आहे. परंतु तो स्वतः कधी ऐकू शकला नाही कारण त्याला आवाज ऐकण्याची नाही तर कल्लोळ ऐकण्याची सवय झाली आहे. असा कल्लोळ जो कलेला आणि कलाकाराला उत्पादिकरणात अडकवतो , जो जीवनाला प्रकृतीची अनमोल भेट ह्या संकल्पनेऐवजी नफ्या तोट्याचा व्यवसाय बनवतो ... सर्व कलाकारांनी अविचल अभिनय केला आहे. असे कुठेही वाटले नाही कि कलाकार भूमिकेला सादर करत आहेत, याउलट असे वाटले कि आम्हीच स्वतः आपल्या शरीरा बाहेर आलो आहोत .
तिसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट रोजी " न्याय के भंवर में भंवरी " ह्या नाटकाची प्रस्तुती बघायला मिळाली... ह्या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ' बबली रावत' या नाटकाच्या एकमेव अभिनेत्री होत्या. मानवी सभ्यतेच्या उदयापासून ते आजतागायत पितृसत्तेतून उगम पावलेल्या शोषणकारी आणि दडपशाही प्रवृत्ती ने स्रीच्या सामाजिक न्याय आणि समतेचा बळी घेतला आहे व कशाप्रकारे ह्या पुरुषप्रधान समाजात परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली स्रीला गुलामीच्या बेड्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले गेले, याचे सखोल विस्तारित वर्णन आणि विश्लेषण पाहायला मिळते.

बबलीजींनी अत्यंत परिपक्वतेने  स्रीच्या वेदनेला उघडपणे मांडले आणि संपूर्ण नाटकादरम्यान प्रेक्षकांच्या श्वासाला आपल्या लयतालाने रोखून धरले . ज्या दृढतेने त्यांनी , स्वतःला - " मर्द म्हणवून छाती फुगवणाऱ्या  पुरुषांना आरसा दाखवला त्या अनुभवाला शब्दात व्यक्त करणे कठीणच!

संकेत आवळे यांनी प्रकाश संयोजन उत्तम प्रकारे हाताळले आहे.दिल्लीमध्ये थियेटर ऑफ रेलवन्स नाट्यदर्शना अंतर्गत रंगकर्मी व अभ्यासक स्मृती राज यांनी या रंगउत्सवाचे आयोजन करून दिल्लीला एक नाविन्यपूर्ण आणि अलौकिक रंग अनुभवासोबत एकरूप केले आहे.


जेव्हा मी नाटक पाहायला गेले, तेव्हा हीच कल्पना होती की या नाटकांमध्ये देखील तेच काहीतरी पाहायला मिळेल , सामान्यतः जसे की आजपर्यंत आम्ही थिएटरमध्ये पाहतो. पण थिएटर ऑफ रेलेवन्स ने माझ्या धारणांना तोडले की - थिएटर फक्त एक मनोरंजनाचे साधन आहे. थियेटर हे मनुष्याच्या अंतरात्म्याला  अंर्तमुख करून त्याला चेतना प्रदान करते.

No comments:

Post a Comment

Manjul Bhardwaj’s new Marathi Play ‘Lok-Shastra Savitri ' the Yalgar of Samta !

  Manjul Bhardwaj’s new Marathi Play ‘Lok-Shastra Savitri ' the Yalgar of Samta ! - Kusum Tripathi When I received a call from my old fr...